छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) आयएमए हॉल येथे ८ मे रोजी एक पाऊल यॅलेसिमिया मुक्तीकडे संकल्प सप्ताहाची सांगता आणि थैलेसेमिया मुक्तीसाठी पुढील वाटचाल आरोग्य विभागाचा निर्धार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री व राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १ ते ८ मे २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात संकल्प सप्ताह राबविण्यात येत असून, या सप्ताहाची सांगता या राज्यस्तरीय सोहळ्याने होणार आहे. कार्यक्रमास राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांच्या देखरेखीखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी यॅलेसेमिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.












